हवाई दलाच्या अधिकार्‍यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा   

कॉल सेंटरच्या कर्मचार्‍याला बेदम मारहाण 

बंगळुरू : कर्नाटकात कॉल सेंटरच्या कर्मचार्‍याला हवाई दलाच्या अधिकार्‍याने बेदम मारहाण केली. त्यामुळे त्याच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
विंग कमांडर शैलादित्य बोस, असे अधिकार्‍याचे नाव आहे. त्याने आरोप केला की, कन्नड भाषा बोलणार्‍या एका गटाने शिविगाळ केली. रस्ते अपघात प्रकरणी गटाने माझा बंगळुरू येथे पाठलाग केला. या प्रकरणी विकास कुमार याला अटक केली आहे. तो सॉफ्टवेअर कंपनीच्या कॉल सेंटरमध्ये काम करतो. दोन्ही बाजूंनी परस्पर विरोधी तक्रारी दाखल केल्या आहेत. अधिकारी बोसने विकास कुमारला मारहाण केली. सार्वजनिक ठिकाणी त्याला सर्वांच्या समोर बदडल्याची चित्रफीत देखील प्रसिद्ध झाली होती. त्यावेळी बोस याच्या पत्नीने त्याला अडवितानाची दृश्ये देखील त्यात आहेत.
 
दरम्यान, गृहमंत्री जी. परमेश्वर म्हणाले, विकास कुमार याच्या तक्रारीनंतर अधिकार्‍यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई होणार आहे.  पोलिस आयुक्त बी. दयानंद यांनी स्पष्ट केले की, सीसीटीव्ही आणि प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांचे जबाब घेतल्यानंतर प्रकरणावर अधिक प्रकाश टाकता येणे शक्य आहे 
 

Related Articles